नवी दिल्ली : ऐन उन्हाळ्यात महागाईची झळ सोसणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे.

आज, मंगळवारी (१९ मे) देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरासरी ९० पैशांची वाढ करण्यात आली आहे. इंधनाच्या दरात चालू आठवड्यात झालेली ही दुसरी दरवाढ असून यामुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यापूर्वी गेल्या शुक्रवारीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थेट ३ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता अवघ्या काही दिवसांतच पुन्हा ९० पैशांची वाढ झाल्याने बाजारात महागाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.