बेळगाव : आंतरराष्ट्रीय व्याख्याते,प्रवचनकार आणि साहित्यिक असलेल्या डॉ. सच्चिदानंद शेवडे यांची ‘श्रीराम कथा’ बेळगावात आयोजण्यात आली आहे. दि. २ जून ते दि. ७ जून या कालावधीत केळकर बाग येथील काणे महाराज राममंदिरात दररोज सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत ही रामकथा सादर होणार आहे.

वाचकप्रिय असलेल्या डॉ. शेवडे यांची विविध विषयांवरील ५१ पुस्तके प्रकाशित झालेली असून अनेक पुस्तकांच्या आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. तसेच देशाविदेशात त्यांचे सात हजारांहून अधिक व्याख्यान आणि प्रवचनांचे कार्यक्रम झाले आहेत. अधिक महिन्यात त्यांच्या रसाळ व मार्मिक वाणीतून रामकथा ऐकण्याचा योग बेळगावकरांना आला आहे. तरी श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे.