• प्रथम विवाह, घटस्फोटित, विधवा-विधुर तसेच आंतरजातीय विवाह इच्छुकांसाठी सुवर्णसंधी

बेळगाव : आधुनिक काळात विवाह इच्छुकांना विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने भडकल गल्ली येथील बालाजी वधूवर सूचक केंद्राच्या वतीने रविवार दि. ३१ मे २०२६ रोजी भव्य सर्वजातीय वधू-वर परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

गोवावेस खाऊकट्टासमोरील हॉटेल मधुबन येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत होणाऱ्या या महामेळाव्यात प्रथम विवाह इच्छुकांसह घटस्फोटित, विधवा-विधुर, प्रौढ तसेच आंतरजातीय विवाह इच्छुक युवक-युवतींना सहभागी होता येणार आहे.

विवाहासाठी योग्य जोडीदार शोधणाऱ्या युवक-युवती आणि पालकांना एकाच ठिकाणी संवाद व परिचयाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. महामेळाव्यासाठी आगाऊ नोंदणी सुरू असून नोंदणी शुल्क १००० रुपये निश्चित करण्यात आले आहे. सहभागींसाठी जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

नोंदणी व अधिक माहितीसाठी 6364775513 आणि 9008966941 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.