- बेंगळुरूच्या दांपत्याचा ३२ किमी समुद्री प्रवास
बेंगळुरू : प्रचंड लाटा, जेलीफिशचा धोका आणि समुद्रातील जोरदार प्रवाहाचा सामना करत बंगळुरूच्या एका दांपत्याने ‘राम सेतू’ मार्गे श्रीलंकेहून भारतापर्यंत पोहत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
दानिश अब्दी आणि वृषाली प्रसादे या दांपत्याने श्रीलंकेतील तळेमन्नार ते भारतातील धनुषकोडी असा ३२ किलोमीटरचा समुद्री प्रवास अवघ्या १० तास ४५ मिनिटांत पूर्ण केला. जवळपास ११ तास अखंड समुद्रात झुंज देत त्यांनी हा पराक्रम साध्य केला.
‘राम सेतू’ मार्गावरील अत्यंत खडतर समुद्री प्रवास पूर्ण करणारे ते जगातील पहिले जोडपे ठरले आहे. समुद्रातील प्रतिकूल परिस्थिती, प्रचंड लाटा आणि जेलीफिशच्या धोक्याचा सामना करत त्यांनी ही मोहीम यशस्वी केली.
या विक्रमी कामगिरीमुळे जलतरण क्षेत्रात त्यांच्या धैर्य, चिकाटी आणि जिद्दीचे कौतुक होत असून, क्रीडा क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








