• एसएपी आणि एमएसपी दर वाढवून उसाला प्रतिटन ५,५०० रुपये देण्याची मागणी 
  • पोलिसांनी बॅरिकेड्स लावून आंदोलकांना रोखले

बेळगाव : बेळगाव व खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी राज्य सरकारचा व केंद्र सरकारचा निषेध करत जेलभरोसाठी आंदोलन छेडले. त्यानंतरही सायंकाळपर्यंत घोषणाबाजी करत गटागटाने हिंडलगा कारागृहाच्या दिशेने ते येत होते. यावेळी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोर बॅरिकेड्स लावून शेतकऱ्यांना अडविण्यात आले.

कर्नाटक सरकारने एसएपी दर वाढवावा, तर केंद्र सरकारने एमएसपी दर वाढवून द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. 5,500 रु. दर मिळाला पाहिजे ही मागणी करण्यात येत होती. महाराष्ट्र, बिहार, मध्यप्रदेश या राज्यांतून उसाला योग्य दर मिळतो तर कर्नाटकात का नाही? अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली होती. बेळगाव तालुका रयत संघटनेचे अध्यक्ष रामनगौडा पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. या आंदोलनात हिरेबागेवाडी, खानापूर, हल्याळ, एम.के. हुबळी व बेळगाव भागातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.