बेळगाव : मूळच्या रयत गल्ली वडगाव व सध्या भारत नगर ४ थी गल्ली येथील रहिवासी सौ. इंदू हनमंतराव बिर्जे (वय ७४) यांचे सोमवार दि. २५ रोजी सकाळी ५.२० वा. निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले,पाच मुली, नातवंडे आणि पणतवंडे असा मोठा परिवार आहे. बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे माजी अध्यक्ष पै. सुधीर बिर्जे यांच्या आई व साडी कारखानदार व प्रगतशील शेतकरी हनमंत बिर्जे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यावर आज सकाळी ११:०० वाजता शहापूर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.