- बालाजी वधू – वर सूचक केंद्रातर्फे आयोजन ; आगाऊ नोंदणीला सुरूवात
बेळगाव : सर्व जाती तसेच आंतरजातीय विवाह इच्छुक युवक-युवतींसाठी येत्या ३१ मे २०२६ रोजी बेळगाव येथे भव्य वधू-वर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भडकल गल्ली येथील बालाजी वधू-वर सूचक केंद्राच्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
गोवावेस येथील हॉटेल मधुबन येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत हा महामेळावा पार पडणार आहे. विविध समाजातील विवाह इच्छुक युवक-युवतींना एकाच व्यासपीठावर योग्य स्थळांची माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आंतरजातीय विवाह इच्छुकांसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली असून, इच्छुकांनी आगाऊ नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. मेळाव्यास उपस्थितांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
अधिक माहिती आणि नोंदणीसाठी ६३६४७७५५१३ किंवा ९००८९६६९४१ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.








