बेंगळुरू : राज्यातील परीक्षा व्यवस्थ अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने कर्नाटक सरकारने सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परीक्षा पद्धतीतील त्रुटी दूर करून आवश्यक बदल लागू करण्याबाबत मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय समितीशी सविस्तर चर्चा केली.
विधानसौध येथे आयोजित बैठकीत परीक्षा प्रक्रियेत कोणत्या प्रकारच्या सुधारणा करता येतील, त्यासाठी कोणती उपाययोजना आवश्यक आहे आणि प्रस्तावित बदलांची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावी, यावर विचारमंथन करण्यात आले.
या बैठकीला उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष नंदन निलेकणी, मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष यू. टी. खादर, मंत्री बसवराज रायरेड्डी आणि प्रियांक खर्गे उपस्थित होते. याशिवाय मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश, राज्य सरकारच्या समितीचे अध्यक्ष एस. व्ही. रंगनाथ, सदस्य विजयभास्कर तसेच कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी डॉ. एच. प्रसन्न यांच्यासह शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.








