• गुंडविरोधी पथकाचा अतिरिक्त कार्यभारही सोपविला

बेंगळुरू : वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत म. निंबाळकर यांची बेंगळुरू शहर वाहतूक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच त्यांच्याकडे गुंडविरोधी पथकाच्या (अँटी रौडी स्क्वॉड) पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

कर्नाटक सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश जारी केले असून, त्यानुसार निंबाळकर यांच्यावर बेंगळुरू शहरातील वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वाहतूक नियंत्रणासह गुंडगिरी आणि संघटित गुन्हेगारीविरोधातील कारवाईची जबाबदारीही त्यांच्याकडे राहणार आहे.

हेमंत निंबाळकर यांनी यापूर्वी बेळगाव जिल्ह्याचे पोलीस प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्या बेंगळुरूतील नव्या नियुक्तीची बेळगावमध्येही चर्चा होत आहे.