• अंतिम सामन्यात बलाढ्य म्हैसूर संघाचा १-० गोलफरकाने पराभव

बेळगाव : कर्नाटक मिनी ऑलिंपिक २०२६ मध्ये बेळगाव डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या संघाने विजेतेपद पटकावत बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. अंतिम सामन्यात बलाढ्य म्हैसूर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या संघाचा १-० गोलफरकाने पराभव करत बेळगावने विजेतेपदावर आपले नाव कोरले.

या अटीतटीच्या सामन्यात नवीन पत्की याने निर्णायक गोल नोंदवत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या यशामुळे कर्नाटकच्या फुटबॉल क्षेत्रात बेळगावने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

या विजयासाठी बेळगाव डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे पदाधिकारी, प्रशिक्षक मानस सर आणि पालकवर्गाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.