• पहिल्या दिवशी दक्षिण विभागातील स्केटर्सची आघाडी

बेळगाव : बिर्ला इंटरनॅशनल स्कूल, ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन आणि शिवगंगा स्पोर्ट्स क्लब यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दक्षिण विभागातील स्केटर्सनी उत्कृष्ट कामगिरी करत आघाडी घेतली. यामध्ये बेळगावच्या सौरभ साळोखे याने ५०० मीटर स्केटिंग प्रकारात सुवर्णपदक पटकावून स्थानिक क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.

पहिल्या दिवसाच्या स्पर्धेत विविध वयोगटांतील खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची कमाई केली. चिनॉय मलिक, काम्या शर्मा, शौर्य भूषण तिवारी, दिव्यांशी बिश्नोई, एक जडन जयेश, साधुरिका एम, पी. व्ही. मोती, प्रवण जे, सुदर्शनी के. एस., दिव्य गणपती के. आर., हीरा चोप्रा, उदित टाक्या, व्ही. कारनिथा, सानिध्या सिन्हा, मानवी त्यागी, के. ओजस्वी, शंतनू अग्रवाल, तेजश्री यू., अभिमन्यू चौहान आणि आणिका कर यांच्यासह अनेक खेळाडूंनी सुवर्णपदके मिळवली.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळूरकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे, सोहम हिंडलगेकर, स्वरूप पाटील, शल्य तारळेकर तसेच बिर्ला इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक, कर्मचारी आणि इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.