बेळगाव : नवकर्नाटक शेतकरी संघटनेच्या बेळगाव जिल्हा महिला आघाडीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड शनिवारी (दि. ५) करण्यात आली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दयानंद पाटील यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या.
या नव्या कार्यकारिणीत बेळगाव जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी लता अनसकर, उपाध्यक्षपदी विजयलक्ष्मी धारवाडकर, सरचिटणीसपदी रक्षा उपाध्ये, सचिवपदी शीला, संघटन सचिव अंजुमा शेख, माध्यम प्रतिनिधी गीता शेट्टर यांची निवड करण्यात आली.
बेळगाव शहर अध्यक्ष संजय परदेशी, उपाध्यक्ष स्वस्तिक मेदार उपस्थित होते. राज्य महिला आघाडीच्या नेत्या दिव्या हादरगी यांनी बोलताना शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी संघटनेची मोठी गरज आहे. या लढ्यात विशेषतः महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे सांगितले. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य बसवराज भारिगिडद यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.







