खानापूर : खानापूर शहरातील सर्वोदय इंग्लिश मीडियम हायस्कूलने २०२५-२६ च्या एसएसएलसी परीक्षेत ९९ टक्के यश मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

या परीक्षेत श्रेयसी नार्वेकर हिने ९६.८८ टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. श्रुती सनदी हिने ९४.८८ टक्के तर सई जाधव हिने ९४.७२ टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशामुळे शाळेचे नाव पुन्हा एकदा उज्ज्वल झाले आहे.

खानापूर तालुक्यातील सर्वात जुन्या शाळांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्वोदय इंग्लिश मीडियम हायस्कूलने यंदाही उच्च निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचे प्राचार्य फादर नेल्सन तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.