- सुवर्ण विधानसौध येथे १० दिवस कामकाज
- मुख्य सचिव शालिनी रजनीश यांचे तयारीचे निर्देश
बेंगळुरू : कर्नाटक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध येथे आयोजित करण्यात येणार आहे. हे अधिवेशन १० दिवस चालणार असल्याची घोषणा राज्याच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी मंगळवारी केली.
१५ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील चर्चेनुसार, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार, ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनासाठी आवश्यक तयारी करण्याचे निर्देश मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी दिले आहेत.
यासंदर्भात त्यांनी विधान परिषद सचिव ज्योती यांना पत्र पाठवून अधिवेशनाच्या आयोजनासाठी आवश्यक कार्यवाही करण्यास सांगितले आहे. सुवर्ण विधानसौध येथे होणाऱ्या या अधिवेशनासाठी संबंधित विभागांनी नियोजन करून आवश्यक तयारी पूर्ण करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.







