बेळगाव : विवाह इच्छुक युवक-युवतींसाठी येत्या रविवार दि. 31 मे 2026 रोजी बेळगाव येथे वधू-वर,पालक परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भडकल गल्ली येथील बालाजी वधूवर सूचक केंद्राच्या वतीने हा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सदर महामेळावा सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत गोवावेस खाऊकट्टासमोरील हॉटेल मधुबन येथे पार पडणार आहे. विवाहासाठी योग्य जोडीदार शोधणाऱ्या युवक-युवतींना तसेच पालकांना एकाच ठिकाणी परिचयाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्रथम विवाहासोबतच घटस्फोटित, विधवा-विधुर, प्रौढ तसेच आंतरजातीय विवाह इच्छुकांसाठी हा महामेळावा विशेष उपयुक्त ठरणार आहे.
या महामेळाव्यासाठी आगाऊ नावनोंदणी सुरू असून नोंदणी शुल्क 1000/- रुपये ठेवण्यात आले आहे. सहभागींसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी 6364775513 किंवा 9008966941 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.








