येळ्ळूर : सिद्धेश्वर गल्ली येथील रहिवासी श्रीमती मोनाका महादेव गोरल (वय ९२ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने गुरुवार दि. २८ रोजी दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, चार मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. दैनिक सकाळचे पत्रकार सी.एम.गोरल यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्यावर सायंकाळी ६ वा. येळ्ळूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.