• वाहतूक ठप्प ; बघ्यांची गर्दी
  • सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी सुरक्षित रेस्क्यू करत वाहतूक केली सुरळीत

बेळगाव : येळ्ळूर मेन रोडवर आज नाग साप आढळल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. साप रस्त्यावर असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि सुमारे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली.

घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र आनंद चिट्टी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सापाचे सुरक्षित रेस्क्यू केले. सापाला सुरक्षितपणे हटविल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.