- अभिषेक, गणहोम, प्रवचन, आरती व महाप्रसादाचे आयोजन
बेळगाव : श्री गजानन महाराज भक्त परिवार केंद्रात मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी श्री गजानन महाराज महानिर्वाण दिन भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सकाळी ७ वाजता श्रींच्या पादुकांवर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी ८ वाजता गणहोम करण्यात आला. गणहोमासाठी श्री. पंढरी परब व सौ. आरती परब तसेच श्री. दीपक कलघटगी व सौ. ज्योती कलघटगी उपस्थित होते.
दुपारी १२ वाजता सौ. सुनीता देशपांडे यांचे प्रवचन झाले. त्यानंतर दुपारी १ वाजता आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी ६ वाजता नित्य उपासना, आरती व शेजारती होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी श्री. राम भंडारी, सौ. सुनीता देशपांडे, श्री. एल. व्ही. देसाई, सौ. जयश्री रेवाळे, श्री. रविंद्र कुळकर्णी, सौ. सुनिता सुभेदार, श्री. सुभाष पेंडसे, श्री. दिनेश पाटील आदी उपस्थित होते.







