बेळगाव : समादेवी गल्ली येथील श्रीपंतवाडा येथे उद्या रविवार दि. २२ रोजी सकाळी ९.३० वा. यमुनाक्का भजनी मंडळाचा ४६ वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. विणा व सौ. यमुनाक्का यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरूवात होईल. दु १ वा. ४६ दिव्याच्या साक्षीने श्री ची महाआरती होईल. त्यानंतर दुपारच्या सत्रात मंडळातील महिलांचे अनुभव कथन व टाळ झंकारचा कार्यक्रम होईल. तरी सर्व पंतभक्तानी यांचा लाभ घ्यावा असे मंडळाच्या अध्यक्षा सुनंदाताई किल्लेकर यांनी कळविले आहे.