बिजगर्णी : विद्यार्थी नेहमी नम्र असला पाहिजे.अभ्यासाबरोबर त्याला कुटुंबाची, समाजांतील घडत असलेल्या घटनांची जाणीव असावी लागते.पुस्तके वाचनातून मन समृद्ध होते.अवांतर वाचन हवे.विविध छंद जोपासा. सुप्त गुणांना वाव मिळाल्याने व्यक्तीमत्व विकास होतो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन हवे निसर्गाच्या जवळ जाऊन आरोग्य जपा. सुंदर विचार मनाला प्रसन्न करतात. चांगल्या संस्कारातून इतरांना आनंद द्या.मन समाधानी असणं हीच खरी गुणवत्ता आहे असे मौलिक विचार अध्यक्षपदावरून बोलताना महात्मा गांधी संस्थेचे अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी बिजगर्णी हायस्कूल मध्ये व्यक्त केले.

बिजगर्णी हायस्कूल मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाय. पी. नाईक उपस्थित होते.

प्रारंभी प्रशालेतील मुलींनी स्वागत गीत सादर केले. मान्यंवराच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश कांबळे यांनी करून वर्षभर राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी प्रशालेचा शंभर टक्के निकाल लागला त्याबद्दल संस्था पदाधिकारी यांच्या कडून मुख्याध्यापक व शिक्षक वर्गाचं भेट वस्तू देऊन कौतुक केले.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्था उपाध्यक्ष एस. एम. जाधव यांच्या एंकेऐशीव्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिक्षकवर्गाकडून शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.प्रशालेतील दहावी उत्तीर्ण झालेले पहिले तीन क्रमांक, कु. प्रियांका तारीहाळकर, वैभव भास्कर, स्नेहा मोरे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह, रोख रक्कम पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

वाय. पी. नाईक, मनोहर बेळगावकर, संतोष कांबळे, बबलू नावगेकर, रामचंद्र हलकर्णीकर, एस. एम. जाधव यांच्याकडून रोख रक्कम बक्षिसे देण्यात आली. तसेच पुढील वर्षी दहावी मध्ये विशेष गुण प्राप्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ए. एल. निलजकर यांनी नव्वद टक्के गुण घेणा-यास पाच हजार रुपये, त्याचप्रमाणे पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना अशोक कांबळे, रामचंद्र हलकर्णीकर, वाय. पी. नाईक, यांच्याकडून रोख रक्कमेची बक्षिसे जाहीर करण्यात आली.

यावेळी अशोक कांबळे, संस्थेचे उपाध्यक्ष सातेरी जाधव, माजी मुख्याध्यापक वाय. एच. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर वाय. पी. नाईक, यल्लापा बेळगावकर, एस. एम. जाधव, अर्जून निलजकर, अशोक कांबळे, पुंडलिक जाधव, के. आर. भास्कर, एम. पी. मोरे, मनोहर बेळगावकर, संतोष कांबळे, निंगापा पाटील, मनोहर पाटील, परशराम भास्कर, बबलू नावगेकर, वाय. एच. पाटील कल्लापा अष्टेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश कांबळे यांनी सूत्रसंचालन सुलभा भास्कर, आभार क्रीडा शिक्षक अरुण दरेकर यांनी केले.