बेळगाव : कुद्रेमनी गावच्या ग्रामदैवत श्री मरगाई देवीच्या गोंधळ यात्रेचे औचित्य साधून लोहार कुटुंबीयांनी भक्तिभावाने *सव्वा तोळ्याचे सोन्याचे गंठण* देवीचरणी अर्पण केले. या धार्मिक व मंगलमय सोहळ्यामुळे यात्रेच्या उत्साहात आणखी भर पडली.

स्वर्गीय अर्जुन सतबा लोहार यांचे सुपुत्र व कुशल कारागिर भरमाणा अर्जुन लोहार, संजय अर्जुन लोहार आणि राजेंद्र अर्जुन लोहार (रा. कुद्रेमानी) यांनी आपल्या कुटुंबाच्या वतीने हा अलंकार अर्पण केला. यावेळी देवीचे मानकरी व पूजारी लक्ष्मी अर्जुन सुतार व मनिषा जोतिनाथ सुतार यांच्याकडे हा दागिना विधिवत सुपूर्द करण्यात आला.

यावेळी लोहार बंधूंनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “मरगाई देवीच्या गोंधळ यात्रेनिमित्त आमच्या कुटुंबाच्या वतीने ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या चरणी हा अलंकार अर्पण करत आहोत.

या प्रसंगी दिपक पाटील, नाना मारुती पाटील, रवी पाटील, मारुती व्यंकट सुतार तसेच शिनोळी येथील दत्तात्रय रामू सुतार यांच्यासह ग्रामस्थ व लोहार कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोंधळाच्या पवित्र वातावरणात हा अर्पण सोहळा उत्साहात पार पडला. लोहार कुटुंबाच्या या दातृत्वाचे ग्रामस्थांनी कौतुक केले. देवीच्या दागिन्यांमध्ये मौल्यवान भर पडल्याने मंदिराच्या वैभवात वाढ झाली असून, आई महालक्ष्मीची कृपादृष्टी लोहार कुटुंबासह समस्त ग्रामस्थांवर कायम राहो, अशी श्रद्धा भाविकांनी व्यक्त केली.