• बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा

बेळगाव : शास्त्रीनगर येथील कॅडेट वेदांत किल्लेकर याने तीन वर्षांचे खडतर सागरी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करत मर्चंट नेव्हीत अधिकारी होण्यासाठी पात्रता मिळवली आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आशियातील अग्रगण्य सागरी संस्थांपैकी एक मानल्या जाणाऱ्या तोलानी मेरिटाइम इन्स्टिट्यूट मधून वेदांतने आपले प्रशिक्षण पूर्ण करून पदवी संपादन केली. कठोर शिस्त, तांत्रिक कौशल्य आणि सागरी प्रशिक्षणातील विविध टप्पे यशस्वीरीत्या पार करत त्याने हे यश मिळवले आहे.

आता येत्या काही वर्षांत वेदांत मर्चंट नेव्हीत अधिकारी म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणार असून, त्याच्या या यशामुळे बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.