• शोकसभेत मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

येळ्ळूर : गावचे सुपुत्र व महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ व कणखर नेते यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अशक्य आहे. ते कडक शिस्तीचे व स्पष्टवक्ते होते. त्यांनी येळ्ळूर गावाला दिशा देण्याची काम केले. समाजासाठी लढणारा लढवय्या नेता आमच्यातून निघून गेल्यामुळे येळ्ळूर गावचे फार मोठे नुकसान झाले आहे. सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. त्याचबरोबर त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करूया. सीमाप्रश्न सुटेपर्यंत सर्वजण एकजुटीने लढू या. अशा शब्दात मान्यवरांनी अर्जुन गोरल यांना श्रद्धांजली वाहिली.

रविवार (दि. २४) रोजी सायंकाळी अर्जुन गोरल यांच्या निधनानिमित्त श्री चांगळेश्वरी मंदिर मध्ये सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोक सभेच्या अध्यक्षस्थानी वामनराव पाटील होते. प्रारंभी वामन पाटील व माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील यांनी कै. अर्जुन गोरल यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले.

प्रास्ताविक प्रकाश अष्टेकर यांनी केले. शोकसभेत दत्ता उघाडे, सी. एम. गोरल, बबन कानशिडे, किरण अण्णा पाटील, डी. जी. पाटील, आनंद पाटील, पी. ए. पाटील, दुधाप्पा बागेवाडी, प्रकाश तोपिनकट्टी, धाकलू करविनकोप, उदय जाधव, माजी जिल्हा पंचायत सदस्य दिलीप कांबळे, परशराम मोटराचे आदींनी शोकसभेत विचार मांडताना अर्जुन गोरल यांच्या कार्याचा आढावा घेत श्रद्धांजली वाहिली.

या सभेला सतीश देसूरकर सुरज गोरल, दयानंद उघाडे, दामू अण्णा परीट, कृष्णा शहापूरकर, नागेश बोबाटे, शिवाजी कदम, शिवाजी गोरल, अजित गोरल प्रकाश मालुचे, रमेश मेणसे, डॉ. विकास मेणसे, अशोक चौगुले, अनिल पाटील, नेताजी गोरल, राकेश परीट, रमेश पाटील, सि. बी. पाटील, अनंत पाटील, दौलत पाटील, बाळू धामणेकर, कृष्णा बिजगरकर, लक्ष्मी मासेकर, सुवर्णा बिजगरकर, रूपा पुन्यान्नावर, अनुसया परीट जोतिबा उडकेकर, तुकाराम टक्केकर, रामदास धुळजी, परशराम घाडी, मारुती तुळजाई, मधू कुगजी, रणजित गोरल, गणपती हट्टीकर, रामा पाखरे, बाळू पाटील, प्रकाश पाटील, रमेश धामणेकर, वसंत पाटील, भरत मासेकर, सी. एस. पाटील, गजानन पाटील, रघुनाथ मुरकुटे, परशराम कंग्राळकर, अनिल पाटील, यल्लाप्पा पाटील, प्रकाश गोरल, सचिन दळवी, मंडोळी, मोरे सावगाव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.