- श्रीमती. हौसाबाई एकनाथ मोरे यांचे निधन
बेळगाव : केळकर बाग येथील रहिवासी श्रीमती. हौसाबाई एकनाथ मोरे (वय ८२ वर्षे) यांचे शनिवारी सकाळी ११ वा. वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन चिरंजीव असून मर्कंटाईल सहकारी सोसायटीचे चेअरमन संजय मोरे यांच्या त्या मातोश्री होत. श्रीमती हौसाबाई यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५.३० वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.








