- सिद्धगौडा मोदगी आणि चुन्नप्पा पुजारी यांची याचिका फेटाळली
बेळगाव : येथील जय किसान होलसेल व्हेजिटेबल मर्चेंट्स असोसिएशनला कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडून मोठा कायदेशीर दिलासा मिळाल्याची माहिती असोसिएशनने दिली आहे. एकल पीठाच्या आदेशाला आव्हान देणारी सिद्धगौडा मोदगी आणि चन्नप्पा पुजारी यांची याचिका १६ ऑक्टोबर २०२६ रोजी खंडपीठाने फेटाळल्याचे असोसिएशनच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणावर सुनावणी झाल्यानंतर खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे असोसिएशनच्या सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत महत्त्वाचा टप्पा गाठल्याची भावना पदाधिकारी आणि सदस्यांनी व्यक्त केली. या निकालामुळे असोसिएशनचे सदस्य, परवानाधारक व्यापारी आणि समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या कायदेशीर लढाईत सहकार्य करणारे वकील, पदाधिकारी, सदस्य आणि समर्थकांचे असोसिएशनने आभार मानले. न्यायासाठीची लढाई एकजुटीने सुरूच राहणार, असा निर्धार असोसिएशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला.








