येळ्ळूर : नेताजी गल्ली येळ्ळूर येथील रहिवासी श्री. लक्ष्मण चांगाप्पा मजुकर (वय ८३) यांचे रविवार दि २२ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे १.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे, दोन विवाहीत मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सकाळी ११ वाजता वैकुंठधाम येळ्ळूर (वेशीमध्ये) स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. रक्षा विसर्जन सोमवार सकाळी ८ वाजता होणार आहे. हिंदवी स्वराज्य युवा संघटना व येळ्ळूर ग्रा. पं. चे माजी अध्यक्ष प्रशांत मजुकर यांचे ते वडील होत.