खानापूर : गोदगेरी (ता. खानापूर) येथील रहिवासी श्री. कृष्णा ओमाण्णा निलजकर (वय ८० वर्षे) यांचे सोमवार दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११:३५ वा. अल्पशा आजाराने गोदगेरी येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, मुलगी, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणेचे सह-सचिव परशराम निलजकर व उमेश निलजकर यांचे ते वडील तर मंडळाचे संचालक रामचंद्र निलजकर यांचे ते काका होत. आज मंगळवार दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वाजता त्यांच्यावर गोदगेरी येथे अंत्यसंस्कार होणार आहे.