बेळगाव : येथील दि पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतर्फे यंदाही सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. सभासदांच्या ज्या मुलांनी दहावी व बारावी परीक्षेत ८५ टक्केहून अधिक तसेच डिप्लोमा, इंजीनियरिंग, पदवी, पदव्युत्तर अंतिम परीक्षेत ७५ टक्के हून अधिक गुण मिळविले असतील तसेच जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा पुरस्कार मिळविले असतील अशा बँकेच्या ‘अ’ वर्ग सभासदांनी शा मुलांच्या गुणपत्रिकेची /सर्टिफिकेटची झेरॉक्स पायोनियर बँकेच्या कोणत्याही शाखेत १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत आणून द्यावी. असे आवाहन पायोनियर बँकेचे चेअरमन श्री. प्रदीप अष्टेकर यांनी केले आहे. पात्र पाल्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन विशेष समारंभात गौरविण्यात येणार आहे.
August 1, 2026
हिंडलगा गणपती मंदिराजवळील घटना पशुपालकाचे सुमारे दीड लाखांचे नुकसान बेळगाव : हिंडलगा येथील गणपती मंदिराजवळ शनिवारी रात्री विजेचा धक्का लागल्याने एका म्हशीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी […]







