- हेस्कॉमच्या दुरुस्तीच्या कामामुळे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत वीज बंद
बेळगाव : हेस्कॉमकडून देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने सोमवारी (दि. ३ ऑगस्ट) बेळगाव शहरातील विविध भागांचा वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत खंडित राहणार आहे.
हेस्कॉमने दिलेल्या माहितीनुसार, आझादनगर, जुने गांधीनगर, दीपक गल्ली, संकम हॉटेल परिसर, बागलकोट रस्ता, जुना पी.बी. रोड, फुलबाग गल्ली, तहसीलदार गल्ली, भांदूर गल्ली, पाटील गल्ली, बसवण कुडची, देवराज अर्स कॉलनी, टी.व्ही. सेंटर, मुख्य बसस्थानक, शेट्टी गल्ली, चव्हाट गल्ली, दरबार गल्ली, जालगार गल्ली, कसाई गल्ली, कीर्ती हॉटेल परिसर, वनखाते कार्यालय परिसर, कोतवाल गल्ली, खडेबाजार, काकतीवेस गल्ली, शनिवार खुट, गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली, नार्वेकर गल्ली, कचेरी गल्ली, उज्वलनगर, गांधीनगर, अमननगर, एसी मोटर्स परिसर, मारुतीनगर, आझाद गल्ली, टेंगिनकेरी गल्ली, पांगुळ गल्ली आणि भोवी गल्ली या परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे.
दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण झाल्यास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. संबंधित भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमकडून करण्यात आले आहे.








