• हिंडलगा गणपती मंदिराजवळील घटना
  • पशुपालकाचे सुमारे दीड लाखांचे नुकसान

बेळगाव : हिंडलगा येथील गणपती मंदिराजवळ शनिवारी रात्री विजेचा धक्का लागल्याने एका म्हशीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत पशुपालकाचे सुमारे दीड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार नगर, सेकंड क्रॉस, डी.डी. रोड, हिंडलगा येथील लक्ष्मण भातकांडे यांच्या मालकीची म्हैस विजेच्या प्रवाहाच्या संपर्कात आल्याने जागीच दगावली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

या घटनेमुळे पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, संबंधित विभागाने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.