बेळगाव : उत्तर विभागाच्या पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर संदीप पाटील यांचा बेळगावमधील वकिलांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. बेळगावमध्ये आयोजित सत्कार समारंभात आयजीपी संदीप पाटील यांच्या कार्यपद्धतीचा वकिलांनी गौरव केला.

सत्कार स्वीकारल्यानंतर, आयजीपी संदीप पाटील यांनी पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था यांच्यातील परस्पर समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. समाजात शांतता, सुरक्षितता आणि कायद्याचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही यंत्रणांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी बेळगाव वकील संघटनेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब घोरपडे, आर. पी. पाटील, एन. आर. लातूर, मारुती कामाण्णाचे, राजू हिरेमठ, विनोद पाटील, निंगाप्पा मस्ती, मोहिते, महेंद्र कांबळे, विभूतीमठ, राजेंद्र नलवडे आणि एम. बी. बोंद्रे या ज्येष्ठ वकिलांसह अनेक वकील उपस्थित होते. उपस्थित सर्व वकिलांनी नूतन आयजीपी यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.