- लक्ष्मी टेकडी परिसरातील निवासस्थानी कागदपत्रांची तपासणी
- सतीश जारकीहोळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवरील कारवाईदरम्यान ईडीची धाड
बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. सतीश जारकीहोळी यांचे निकटचे सहकारी डॉ. गिरीश सोनवलकर यांच्या बेळगाव शहरातील लक्ष्मी टेकडी परिसरातील निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करत कागदपत्रे आणि इतर माहितीची तपासणी केली.
सतीश जारकीहोळी यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी ईडीकडून कारवाई सुरू असतानाच त्यांच्या निकटवर्तीयाच्या निवासस्थानीही छापा टाकण्यात आल्याने या कारवाईकडे विशेष लक्ष लागले आहे.
ईडीचे अधिकारी डॉ. गिरीश सोनवलकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून, तेथील कागदपत्रे आणि इतर संबंधित माहितीची तपासणी करत आहेत. या कारवाईमुळे बेळगावातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, सतीश जारकीहोळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईशीच डॉ. सोनवलकर यांच्या निवासस्थानी झालेल्या छाप्याचा संबंध असल्याचे मानले जात असले, तरी या कारवाईबाबत ईडीकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.








