- रेकी उपचार आणि ध्यानातून आंतरिक शांततेचा अनुभव घेण्याची संधी
बेळगाव : अमावस्येच्या निमित्ताने ‘पाही वाईब्स फाउंडेशन’तर्फे बेळगावात सामूहिक आध्यात्मिक उपचार आणि ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. मन, शरीर आणि आत्म्याला सकारात्मक ऊर्जा देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सत्रात रेकी उपचारासह सखोल ध्यानाचा अनुभव घेता येणार आहे.
हे सत्र गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून शिवबसवा गर्ल्स पीजी, काली आंबराई, न्यू ग्रँड हॉटेलसमोर, बेळगाव येथे होणार आहे. उपचारक म्हणून डॉ. श्रीदेवी रेवण्णावर मार्गदर्शन करणार आहेत.
पवित्र आणि सकारात्मक वातावरणात आयोजित या सत्रातून सहभागींच्या मनाला शांतता मिळण्यासोबतच आध्यात्मिक उपचाराचा अनुभव घेता यावा, यासाठी विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. रेकी उपचार आणि ध्यानाच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा व आंतरिक शांततेचा अनुभव घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हे सत्र सर्वांसाठी खुले असून, इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे ‘पाही वाईब्स फाउंडेशन’तर्फे सांगण्यात आले आहे.








