बेंगळुरू : बहुचर्चित बेंगळुरू – मुंबई एक्स्प्रेसला अखेर प्रारंभ झाला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी (दि. १७) एक्स्प्रेसचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले.उद्घाटनानंतर मंत्री वैष्णव म्हणाले, २०१४ पासून कर्नाटकात सुमारे १,७५० किलोमीटर लांबीच्या नवीन लोहमार्गांची उभारणी करण्यात आली आहे.
हासन-मंगळुरू लोहमार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून सध्या तिथे चाचण्या सुरू आहेत. बंगळूर आणि मुंबई दरम्यान ‘वंदे भारत स्लीपर’ सेवेची सुरुवात लवकरच होईल. सध्या कर्नाटकात १२ ‘वंदे भारत’ धावत आहेत. बेंगळुरू -मंगळुरू मार्गावर सध्या चाचण्या सुरू असून लवकरच मडगावपर्यंतच्या किनारपट्टी भागातील संपर्क व्यवस्था सुलभ होईल. मुंबई, बेंगळुरू आणि इतर प्रमुख शहरांना एकमेकांशी जोडण्याच्या दीर्घकालीन दृष्टिकोनातून या रेल्वे जाळ्याचा विस्तार होऊन ते ७,००० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.
May 18, 2026
बेळगाव : वझे गल्ली वडगाव येथील रहिवासी श्री. विजयसिंह आप्पाजी पाटील (वय ६८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी एक मुलगा, […]








