- धार्मिक कार्यक्रमांसह पारंपरिक मिरवणूक उत्साहात
- हजारो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा घेतला लाभ
बेळगाव : श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारनिमित्त कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
शेवटच्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून गावातून भव्य पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीत तरुण-तरुणींनी सादर केलेली विविध साहसी प्रात्यक्षिके विशेष आकर्षण ठरली. तसेच आकर्षक पद्धतीने सजवलेल्या बैलगाड्यांनीही नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
- हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ :
श्री सिद्धेश्वर भक्त मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांनी रांगेत उभे राहून श्री सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त कणबर्गी परिसरात दिवसभर भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.








