बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथील विद्यार्थी ध्यानेश बामणे याने कर्नाटक व्ही मिनी स्टेट गेम्स २०२६ या फुटबॉल स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.

ही स्पर्धा युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभाग व कर्नाटक ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. यात ध्यानेशने बेळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन (BDFA) चे प्रतिनिधित्व करताना अंतिम सामन्यात म्हैसूर DFA चा १-० असा पराभव करण्यात मोलाची भूमिका बजावून शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.

या यशाबद्दल शालेय एस.एम.सी.कमिटीचे चेअरमन प्रा. श्री. आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रो. श्री. आर. एस. पाटील, सेक्रेटरी प्रो. श्री. नितीन घोरपडे, प्राचार्य श्री. प्रदीप पाटील, उपप्राचार्य श्री. मनोहर करडी यांनी ध्यानेशचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.