बेळगाव : २०२६ च्या दक्षिण भारत कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कर्नाटक स्पोर्ट्स हॉस्टेल, बेळगाव येथील कुस्तीपटू साईराम मोहन आठवणी याने सुवर्णपदक पटकावत खानापूर तालुक्यासह बेळगाव जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

बिडी (ता. खानापूर) येथील साईरामने फ्रीस्टाईल, ग्रीको-रोमन व महिला गटांच्या स्पर्धेत दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत विजय मिळवला. कठोर परिश्रम, शिस्तबद्ध सराव आणि एकाग्रतेच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले.

त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कर्नाटक स्पोर्ट्स हॉस्टेल, बेळगाव येथील प्रशिक्षक आणि क्रीडा अधिकाऱ्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. साईरामच्या सुवर्ण विजयामुळे कर्नाटक राज्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.