बेळगाव : सालाबाद प्रमाणे श्री शनैश्वर एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटी, बेळगाव यांच्यावतीने श्री शनैश्वर जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिर आज शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.

सदर रक्तदान शिबिराच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे ॲड. सुधीर सक्री व डॉ. संतोष पत्तार यांच्यासह डॉ. श्रीकांत विरगी, डॉ. विठ्ठल माने आदी मान्यवर उपस्थित होते. ॲड. सक्री आणि डॉ. पत्तार यांनी अनुक्रमे छ. शिवरायांची मूर्ती व जगद्गुरु बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गजानन पाटील आणि शिवराज पाटील यांच्या हस्ते होण्यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संचालक श्रीकांत देसाई, संजय शहा, महांतेश देसाई, शिवाप्पा इटगी, महादेव चौगुले, नितीन कपिलेश्वरकर, महेश नावगेकर, सुनील वर्टी, किरण परब, राजू वर्पे, राजू मरवे आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिराला सकाळी ९ वाजता प्रारंभ झाल्यानंतर अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. त्यामुळे सुमारे १५० युनिट रक्ताचे संकलन झाले. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे रक्तदानामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. प्रत्येक रक्तदात्याला कर्नाटक बँकेच्यावतीने सफरचंदाचे वाटप करण्यात आले.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यात डॉ. विरगी आणि डॉ. माने यांच्या मार्गदर्शनाखाली केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान लाभले. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह सुनील कुडची ॲड. सुहास किल्लेकर आदी मान्यवरांनी शिबिराला विशेष भेट देऊन उपक्रमाची प्रशंसा केली. शिबिर यशस्वी करण्यासाठी सतीश गोरगोंडा, विकास कलघटगी, पवन पाटील, किरण सव्वाशेरी, प्रभाकर हलगेकर वगैरेंनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी श्री शनैश्वर एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटी अध्यक्ष अनिल चौधरी यांनी सर्वांचे आभार मानले.