बेळगाव : श्रीमद जगदगुरु शंकराचार्य जयंती उत्सवानिमित्त चिदंबर नगर येथील श्री चिदंबरेश्वर मंदिरात शनिवार दि. १८ ते मंगळवार दि. २१ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १८ ते २१ या चार दिवसांत दररोज सकाळी ८ ते ९ या वेळेत श्री रुद्राभिषेक, महापूजा आणि आरती होणार आहे. तसेच सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत विविध महिला मंडळांकडून स्तोत्र आणि भजन सेवा सादर केली जाणार आहे.
सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत श्री स्वप्रकाशानंद स्वामीजी आणि श्री चिदंबर मुनवळ्ळी यांचे श्री शंकर तत्त्वज्ञानावर आधारित प्रवचन होणार आहे.
रविवार दि. १९ रोजी सायंकाळी ४ वाजता विद्यार्थ्यांसाठी श्रीमद जगदगुरु शंकराचार्य कृत स्तोत्र पठण (वाचन) स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी कोणतेही एक स्तोत्र निवडून सादर करायचे आहे.
जयंती उत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक सेवा आयोजित करण्यात आल्या असून, सेवा करू इच्छिणाऱ्या भक्तांनी मंदिरात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रा. संजीव कुलकर्णी (मो. ९४४९५२९३९३) यांच्याशी संपर्क साधावा.








