• शाळेचा १०० टक्के निकाल

बेळगाव : कॅम्प भागातील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल इंग्रजी माध्यम शाळेचा सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर झाला असून, यंदाही शाळेने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत १०० टक्के निकाल नोंदवला आहे.

या परीक्षेत साची शंकर गोकावी हिने ४८६ गुण (९७.२%) मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. आदर्श राजकुमार पाखरे याने ४७८ गुण (९५.६%) मिळवून द्वितीय, तर सदानंद गोपाळ चौगुले याने ४६९ गुण (९३.८%) मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.

त्याचप्रमाणे श्रावणी सोमनाथ शिंदे हिने ४४४ गुण (८८.८%) मिळवत चतुर्थ आणि सिद्धार्थ अनिल पावसकर याने ४४३ गुण (८८.६%) मिळवत पाचवा क्रमांक पटकावला आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे चेअरमन प्रो. आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रो. आर. एस. पाटील, सेक्रेटरी प्रो. नितीन घोरपडे, ॲडव्हायझरी डायरेक्टर श्रीमती मायादेवी अगसगेकर, प्राचार्य श्री. प्रदीप पाटील, उपप्राचार्या श्रीमती. सोनाली कंग्राळकर तसेच शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.