बिजगर्णी : येथील पश्चिम विभाग शिक्षण मंडळ संचलित बिजगर्णी हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रशालेने आपली शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवली आहे.

या परीक्षेत कु. प्रियांका शिवाजी तारिहाळकर हिने ८१.९२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कु. वैभव शंकर भास्कर याने ७९.५२ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर कु. नेहा संजय मोरे हिने ७८.८८ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष एस.आर. मोरे, उपाध्यक्ष एस.एम. जाधव, सचिव ए.एल. निलजकर, तसेच पी.पी. बेळगावकर, मनोहर पाटील, अशोक कांबळे, के.आर. भास्कर, पुंडलिक जाधव, यल्लापा बेळगावकर आदी पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक रमेश कांबळे यांचे अभिनंदन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकवर्गाचेही सर्वत्र कौतुक होत असून पालकांनी निकालाबाबत समाधान व्यक्त केले आहे.