- वेदिका नावगेकर प्रथम
बेळगाव : टी.एफ.ई. सोसायटीच्या बालिका आदर्श विद्यालय, मंगळवार पेठ, टिळकवाडी येथील एस.एस.एल.सी. परीक्षा 2026 चा निकाल 95% लागला असून विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या परीक्षेत कु. वेदिका लक्ष्मण नावगेकर हिने 95.68% गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तर सायली विनोद पाटील (95.52%) हिने द्वितीय आणि वैभवी निलेश यळगुळकर (93.92%) हिने तृतीय क्रमांक मिळवला.
याशिवाय आचल अनिल धाडवे (93.76%), ऋतुजा दशरथ सुतार (93.28%), अनुश्री श्रीधर पाटील (92.80%), स्नेहल बसाप्पा गवळी (91.04%), सौम्या ज्योतिबा बेळगावकर (90.56%), इच्छा अमृत जाधव (90.08%), वैष्णवी मारुती कणबरकर (90%) आणि श्रद्धा यल्लाप्पा पाटील (90%) यांनीही उल्लेखनीय यश मिळवत शाळेचा मान उंचावला. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.








