- दोघांना अटक
अथणी : तालुक्यातील बळ्ळीगेरी गावाच्या हद्दीतील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला. या कारवाईत लॉज मालकासह दोघांना अटक करण्यात आली असून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे.
याबाबत घटनस्थळावरून प्राप्त माहितीनुसार, प्रशांत हॉटेल अँड लॉजमध्ये मालक सरदार भगवंत कांबळे हा महिलेच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अथणी पोलिसांनी नियोजनबद्ध कारवाई करत छापा टाकला.
यावेळी लॉज मालक सरदार कांबळे आणि ग्राहक प्रविण मल्लारी यांना अटक करण्यात आली. कारवाईदरम्यान पीडित महिलेला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.या प्रकरणी अथणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.








