• ९२ एकरांवर प्रकल्प ; मंजुरीनंतर अधिसूचना, जमीनमालकांना भरपाई व पुनर्वसन

बेळगाव : कर्नाटक गृहनिर्माण मंडळाने (केएचबी) शहराजवळील होन्निहाळ येथे सुमारे ९२ एकर जागेवर नवीन निवासी लेआउट विकसित करण्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पाबाबत सार्वजनिक अधिसूचना जारी केली जाणार आहे.

बसवनगुडी परिसरातील देवराज उर्स कॉलनीनंतर तब्बल दशकभरानंतरचा हा केएचबीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे. प्रस्तावित लेआउटमध्ये सर्वेक्षण क्रमांक ४३/१ ते ४३/६ मधील जमिनीचा समावेश करण्यात आला आहे.

या प्रकल्पासाठी जमीन संपादन करताना संबंधित जमीनमालकांना नुकसान भरपाई देण्यात येणार असून २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार पुनर्वसन व पुनर्स्थापना लाभही दिले जाणार आहेत. प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया वेगाने राबवली जाणार आहे.