• बेळगावच्या विकासकामांना मिळणार नवी दिशा

बेळगाव : राज्य सरकारने बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांची बेळगाव शहरी विकास प्राधिकरणाच्या (बुडा) अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या सेठ यांच्यावर सरकारने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

बुडाचे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या जागी आसिफ सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारच्या सचिव लता के. यांनी मंगळवारी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला असून, नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.

बेळगाव शहरातील विविध विकासकामे, नियोजन आणि पायाभूत सुविधांशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी आता आमदार आसिफ सेठ यांच्याकडे आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शहराच्या विकासकामांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.