बेळगाव : शंकर गल्ली, वेंगुर्ला रोड सुळगा (हिं.) येथील रहिवासी तथा माजी सैनिक श्री. गंगाधर परशराम निलजकर (वय ४६) यांचे आज बुधवार दि. ६ मे २०२६ रोजी दुपारी १.२४ वा. अल्पशा आजाराने निधन झाले.  सुळगा येथील आजी – माजी सैनिक संघाचे ते सदस्य होते. त्यांच्या पश्चात आई – वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी ५.३० वा. सुळगा (हिं.) स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.