• अनुरूप जोडीदार शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी
  • बालाजी वधू-वर केंद्रातर्फे आयोजन

बेळगाव : विवाह इच्छुकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून देत शहरात भव्य वधू-वर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध समाजघटकांतील वधू-वरांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

बालाजी वधू-वर केंद्र, बेळगाव यांच्या वतीने रविवार, दिनांक १७ मे रोजी जालगार मारुती मंदिर मंगल कार्यालय, चव्हाट गल्ली येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागींच्या सुविधेसाठी दोन स्वतंत्र सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत नव्या वधू-वरांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. तर दुपारी २ ते ५ या वेळेत सर्व जातींच्या पुनर्विवाह इच्छुक, घटस्फोटित, विधुर, विधवा तसेच निवृत्त ज्येष्ठ नागरिकांसाठी सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून  इच्छुकांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मेळाव्यासाठी ५००/- रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

नोंदणी व अधिक माहितीसाठी ९००८९६६९४१ आणि ६३६४७७५५१३ या क्रमांकांवर संपर्क साधावा. सहभागी होताना फोटो, बायोडाटा तसेच वधू किंवा वरासह उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.