बेळगाव : बेळगाव बार असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीने सोमवारी अधिकृतपणे पदभार स्वीकारत पुढील कार्यकाळाची सुरुवात केली. अध्यक्षपदी निवड झालेले ज्येष्ठ वकील ॲड. बी. जे. गंगाई यांच्या नेतृत्वाखाली नव्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या या कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून ॲड. पवन पाटील व ॲड. जयश्री मंड्रोळी, सरचिटणीस ॲड. सचिन शिवण्णावर, खजिनदार ॲड. निर्मला पाटील, सहसचिव ॲड. प्रशांत पाटील यांचा समावेश आहे. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲड. अभिषेक तारिहाळ, ॲड. जी. ए. हिरेमठ, ॲड. मल्लाप्पा होळी, ॲड. वसंत हक्केण्णावर, ॲड. दीपा मर्डी, ॲड. राजश्री पाटील व ॲड. ज्योती पट्टणशेट्टी यांनीही पदभार स्वीकारला.
यावेळी अध्यक्ष ॲड. बी. जे. गंगाई यांनी वकिलांनी दिलेल्या जबाबदारीची जाणीव व्यक्त करत ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्वांना विश्वासात घेऊन काम करत वकिलांच्या समस्या सोडवण्याबरोबरच न्यायालयीन कामकाजातील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.








