बेळगाव : ऐतिहासिक शिवजयंती उत्सव चित्ररथ मिरवणुकीदरम्यान युवा सेना बेळगावतर्फे यंदाही सामाजिक जाणिवेचा परिचय देणारा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. मिरवणुकीत सहभागी व गर्दी करणाऱ्या शिवभक्तांसाठी थंड ताक आणि अल्पोपाहाराचे वाटप करण्यात आले.

बेळगावची शिवजयंती मिरवणूक अनेक तास चालणारी असल्याने, उन्हाळ्यात शिवभक्तांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन युवा सेनेने हुतात्मा चौक परिसरात विशेष काउंटर उभारला. येथे थंडगार ताक तसेच पुलावाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा सुमारे ३००० हून अधिक शिवभक्तांनी लाभ घेतला.

गेल्या काही वर्षांपासून युवा सेना बेळगावतर्फे मिरवणुकीदरम्यान शीतपेय वाटपाचा उपक्रम सातत्याने राबवला जात असून, यंदाही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांसह कार्यकर्त्यांनाही या उपक्रमामुळे दिलासा मिळाला.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी युवा सेना बेळगावचे विनायक हुलजी, मल्हारी पावशे, वैभव कामत, श्वेत तवनशेट्टी, संदेश तवनशेट्टी, विजय मोहिते, अद्वैत चव्हाण-पाटील, ओमकार बैलूरकर, श्रेय मिठारी, सक्षम कंग्राळकर, निलेश पाटील, अथर्व जाधव, विद्येश बडसकर, सुरज तेली, प्रज्वल मुद्दापुरे, स्वयं कपिलेश्वरी, आदित्य गावडे, साई नायडू यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शिवभक्तांनी या उपक्रमाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.