बेळगाव / प्रतिनिधी

आधार एज्युकेशन सोसायटी संचालित मंडोळी रोड येथील जोशीज सेंट्रल पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ नुकताच पार पडला. सीबीएसई अभ्यासक्रमातील दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यानिमित्ताने या सत्कार समारंभाचे आयोजन होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन डॉ. डी. टी. बामणे उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य डॉ. अरुण जाधव व्यासपीठावर होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर चेअरमन डॉ. डी. टी.बामणे यांनी विद्यार्थ्यांना उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देणारे विचार व्यक्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम संयोजनासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.